![](https://triloknews.com/wp-content/uploads/2025/02/Screenshot_20250213_210337.jpg)
राजन साळवींनंतर इशान्य मुंबई चे शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय दिना पाटीलही धनुष्यबाण हाती घेणार…..?
ही अफवा आहे संजय पाटील यांचे स्पष्टीकरण…..
मुंबई : ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील हे ठाकरेंची शिवसेना सोडून शिंदे गटात जाणार आहेत, अशा अफवा गेल्या काही दिवसांपासून प्रसार माध्यमांमध्ये पसरत आहेत.
मात्र या केवळ अफवा असून त्यांच्यावर कोणीही विश्वास ठेवू नये, असे स्पष्टीकरण खासदार संजय दिना पाटील यांनी दिले आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षांतराच्या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महाराष्ट्र सदन मधील झालेल्या कार्यक्रमाला खासदार संजय दिना पाटील उपस्थित होते. शिवाय त्यांनी शिंदे यांचे जेवणाचे निमंत्रण ही घेतले होते. त्यातच राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने खासदार संजय दिना पाटील यांच्या पक्षांतराला अधिकच बळ मिळाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे दिल्लीपासून मुंबईपर्यंत अफवांना बळ मिळाले होते.
दरम्यान, खासदार संजय दिना पाटील शिंदे गटात जाणार आहेत. मात्र ही केवळ अफवा असल्याचे खुद्द खासदार संजय दिना पाटील यांनी सांगितले आहे. महाराष्ट्र सदन मध्ये झालेल्या कार्यक्रमाचे तसेच जेवणाचे निमंत्रण मिळाल्याने आपण त्या ठिकाणी गेलो होतो. त्याचा चुकीचा अर्थ कोणी लावू नये. ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार, या अफवा असल्याचे संजय दिना पाटील यांनी म्हटले आहे.