ताज़ा ख़बरेंपुणेमहाराष्ट्र

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे ११ वे वंशज शिरीष महाराज यांची शेवटची इच्छा पूर्ण महाराज

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मदतीचा हात पुढे

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे ११ वे वंशज शिरीष महाराजांची शेवटची इच्छा पूर्ण.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मदतीचा हात पुढे .

पुणे : विराम पवार

पुणे : देहू मधील प्रसिद्ध कीर्तनकार, व्याख्याते शिरीष महाराज मोरे यांनी गेल्याच आठवड्यात आर्थिक विवंचनेला कंटाळून आत्महत्या केली होती.
त्यांनी मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत आपल्यावर 32 लाखांचे कर्ज झाले असून ते फेडणे शक्य होत नसल्याने आपण टोकाचे पाऊल उचलत असल्याचे लिहिले होते. त्यांनी असा टोकाचा निर्णय घेऊन जीवन संपवले. महाराजांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबाला बसलेला धक्का पाहून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोरे कुटुंबाला मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्याना 32 लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला असून ही मदत घेऊन त्यांनी आमदार विजय शिवतारे यांना आजच शिरीष महाराज मोरे यांच्याघरी जाऊन ही मदत त्यांच्या कुटूंबियांना सुपूर्द करण्यास सांगितले आहे. आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याची आर्त विनवणी शिरीष महाराज मोरे यांनी आपल्या मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रातून सर्व मित्रमंडळींना केली होती. त्यांच्या याच विनवणीला साद देत संवेदनशील स्वभावाचे नेते अशी ओळख असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोरे कुटूंबाला आर्थिक विवंचनेतून बाहेर काढण्यासाठी आपला मदतीचा हात पुढे केला आहे.

Show More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!