महाराष्ट्रमुंबई

राज्यातील गड किल्ल्यांवरील अतिक्रमणे हटवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अल्टिमेट

राज्यातील सर्व गड किल्ल्यांवरील अतिक्रमणे ४ महिन्यात हटवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा अल्टिमेट.

मुंबई प्रतिनिधी.

मुंबई : राज्यातील गड- किल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने पाऊल उचलले आहे. राज्यातील गड किल्ल्यांवर अतिक्रमण असल्याचे राज्य सरकारच्या निदर्शनास आले आहे. गड-किल्ले अतिक्रमणमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आक्रमक पवित्रा घेतला असून 31 मे पर्यंत राज्यातील सर्व गड किल्ल्यांवरील अतिक्रमणे हटवण्याचे आदेश दिले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यातील गड किल्ले महत्त्वाचे आहेत. विशालगडावर झालेल्या अतिक्रमणानंतर गड किल्ल्यांच्या संवर्धनाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. विशालगडाप्रमाणे राज्यातील अनेक गड किल्ले देखील अतिक्रमित असल्याची बाब समोर आल्यानंतर सरकारने त्याबाबत काहीतरी ठोस निर्णय घ्यावा असा मागणी केली जात होती. त्यापार्श्वभुमीवर सरकारने मोठे निर्णय घेतले आहेत.

Show More
Back to top button
error: Content is protected !!