
![]()
काल वैशाखी पौर्णिमा म्हणजेच तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी संपूर्ण जगाला शांतीचा करुनीचा दयेचा प्रेमाचा बंधू भावाचा संदेश देणारे विश्ववंदनीय महाकारूणी तथागत भगवान गौतम यांची ,बुद्ध जयंती संपूर्ण जगामध्ये साजरी करण्यात आली व त्याच अनुषंगाने मंगल मैत्री बुद्ध विहार लपालीच्या वतीने बुद्ध जयंती साजरी करण्यात आली. अमोल अरुण इंगळे,दीपक अरुण इंगळे यांच्याकडून भोजनदान देण्यात आले, तसेच भारतीय बौद्ध महासभा मलकापूर तालुक्याचे पदाधिकारी वाघ सर आणि त्यांची टीम यांनी मार्गदर्शन केले तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक , धम्म उपासक, उपासिका धम्म बालक धम्मपालिका मोठ्या संख्येने उपस्थितीत राहून यांच्या उपस्थितीमध्ये बुद्ध जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने, आनंदाने , साजरी करण्यात आली सुरुवातीला त्रिशरण पंचशील, बुद्ध पूजन, बुद्ध वंदना, धम्म वंदना,संघ वंदना, परित्राण पाठ, आशीर्वाद गाथा, शेवटी सर नथय गाथा घेऊन कार्यक्रम संपन्न झाला.
बुद्ध पौर्णिमेच्या परत सर्वांना हार्दिक शुभेच्छा.💐💐💐
सर्वांचे मंगल हो, कल्याण हो,
जय भीम
नमो बुद्धाय 👏👏👏
रिपोटर :- मुकेश इंगळे
मो.नं . ८०८०१३१३२५