
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 22 अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आल्याचं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. घटनेनंतर काही वेळातच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या.
Alipur Fire Incident : दिल्लीतील एका मार्केटमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर चारजण जखमी झालेत. उत्तर दिल्लीच्या अलीपूर भागातील दयाल मार्केटमधील एका पेंट फॅक्टरीत (Alipur Fire Incident) ही घटना घडलीये. गुरुवारी सायंकाळी उशिरा मार्केटमध्ये भीषण आग लागली.