महाराष्ट्रमुंबई

दादर टोरेस ज्वेलरी घोटाळा

मोठी बातमी

मुंबई : दादरमध्ये फुटपाथवर भाजी विकणाऱ्याने Torres Company मध्ये गुंतवले 4,00,00,000! एवढा पैसा कुठून आणला.? 

मुंबईत टोरेस ज्वेलरी कंपनीचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. मुंबईमध्ये टोरेस नावाच्या ज्वेलर्स कंपनीनं कमी कालावधीत दुप्पट पैसे करून देण्याचे अमिश दाखवत गुंतवणूकदारांची मोठी फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे(Torres Company Scam). या घोटाळ्यात मोठी अपडेट समोर आली आहे. दादरमध्ये फुटपाथवर भाजी विकणारे प्रदिप कुमार वैश्य यांनी  Torres Company मध्ये तब्बल 4 कोटी रुपये गुंतवले होते. या भाजी विक्रेत्याने एवढा पैसा कुठून आणला याचे मोठे आश्चर्य आहे.

प्रदीपकुमार वैश्य (वय 31 वर्षे) यांनी Torres Company मध्ये 4 कोटी रुपये गुंतवले होते. फसवणुक झाल्याचे लक्षात येताच प्रदीपकुमार वैश्य यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे दादरच्या टोरेस शोरूमसमोर फुटपाथवर यांचे भाजीपाल्याचं दुकान आहे. शोरुमसमोर होणारी गर्दी पाहून त्यांनी या कंपनीबाबत माहिती मिळवली. येथे पैसे गुंतवले की डायमंड मिळतो आणि गुंतवणुकीवर व्याजही मिळत असल्याचे समजल्यावर त्यांनी कंपनीत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला.
आणि आता कुटूंबातील लोकांवर पश्चात्तापाचा डोंगर कोसळला आहे.

Show More
Back to top button
error: Content is protected !!