
उदगीर, (जि.लातुर) : शहरातील नाईक चौकातील उच्चभ्रु वस्तीतील एका कुंटणखान्यावर गुरुवारी (ता.१५) सायंकाळी ग्रामीण पोलिसांनी धाड टाकून आठ जणांना पकडले आहे. यातील दोन पिडीतेची लातूरच्या महिला सुधारगृहात रवांनगी केली असून सहा जणांवर अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमानुसार ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत ग्रामीण पोलीसाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की गुरुवारी सायंकाळी नाईक चौकातील एका उच्चभ्रू वस्तीमध्ये कुंटणखाना चालू असल्याची माहिती ग्रामीण पोलीस निरीक्षकांना मिळाल.त्यांनी सापळा रचून सदर वस्तीतील पोतदार यांच्या घरात सुरू असलेल्या कुंटण खाण्यावर धाड टाकली. त्यावेळेस त्यांना चार महिला, तीन ग्राहक पुरुष व घरमालक कुंटणखाना चालवत असल्याचे दिसून आल्याने रंगेहात पकडले
याबाबत ग्रामीण पोलीसाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की गुरुवारी सायंकाळी नाईक चौकातील एका उच्चभ्रू वस्तीमध्ये कुंटणखाना चालू असल्याची माहिती ग्रामीण पोलीस निरीक्षकांना मिळाल.त्यांनी सापळा रचून सदर वस्तीतील पोतदार यांच्या घरात सुरू असलेल्या कुंटण खाण्यावर धाड टाकली. त्यावेळेस त्यांना चार महिला, तीन ग्राहक पुरुष व घरमालक कुंटणखाना चालवत असल्याचे दिसून आल्याने रंगेहात पकडले.