Uncategorizedताज़ा ख़बरें

“भाजपाला मोठा दणका”जेष्ठ नेते भाजपला सोडचिट्टी देत ठाकरे पक्षात घेतला प्रवेश

भाजपाचे जेष्ठ नेते दीपक माने यांचा हजारो कार्यकर्त्यांबरोबर मातोश्री वर उद्धव ठाकरे यांचा हस्ते शिवबंधन भांदून पक्ष प्रवेश

*भाजपचे ज्येष्ठ नेते मा. दिलीप माने यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश*

*मुंबईमध्ये भाजपला मोठे खिंडार*

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये  भाजपचे ज्येष्ठ नेते मा.दिलीप माने यांचा मातोश्रीवर जाहीर प्रवेश झाला. या प्रसंगी शिवसेनेचे नेते आ.अनिल परब,       आ. ऋतुजा लटके आदी मान्यवर उपस्थित होते. दिलीप माने यांच्या नेतृत्वाखाली उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये असंख्य कार्यकर्त्यांसह बंजारा समाजाचे नेते अविनाश राठोड आणि दिलीप पवार यांनी कार्यकर्त्यांसह प्रवेश केला तसेच शिवसंग्राम संघटनेचे चित्रपट -सांस्कृतिक विभागाचे महाराष्ट्र अध्यक्ष दिपक कदम आणि सचिन गायकवाड यांनीही जाहीर प्रवेश केला. महादेव लटके आणि बाळाजी कावळे यांच्यासह एमआयडीसी अंधेरी येथून चर्मकार समाज बांधवांनी  मोठ्या संख्येने ठाकरे गटात प्रवेश केला. मातंग समाजाचे नेते मारुती सूर्यवंशी व भगवान जाधव यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला असून विशाल देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई उपनगरातून अनेक माथाडी कामगारांनी प्रवेश केला.

सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी शिवाजी          तादालापूरकर यांच्यासह सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला.

भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप माने हे गेली २५ वर्ष राजकीय क्षेत्रात सक्रिय  आहेत. त्यांनी याआधी भारतीय जनता पक्षात मुंबई उपाध्यक्ष म्हणून कारकीर्द गाजवली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात  प्रदेश सचिव तसेच मुंबई जिल्हाध्यक्ष  म्हणून महत्त्वाच्या पदांवर कामगिरी केली. शिवसंग्राम संघटनेचे मुंबई अध्यक्ष म्हणून आपला कामाचा ठसा उमटविला.

पक्ष प्रवेशाच्या वेळी दिलीप माने यांनी आपल्या भावना व्यक्त करताना, आपल्या 25 वर्षाच्या राजकीय जीवनाचा आढावा घेत  मा.उद्धव ठाकरे यांच्या सध्याच्या राजकीय लढ्यात   महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आणि उन्नतीसाठी त्यांच्यासोबत ठामपणे उभे राहून त्या लढ्याचा एक भाग बनण्याच्या उद्देशाने सोबत जोडण्याचा दृढ  निर्णय आम्ही सर्वांनी घेतला असल्याचे जाहीर केले.

मा. उद्धव साहेब आणि  अनिल परब साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली  मुंबईमध्ये तळागाळातील मराठी माणूस तसेच  मुस्लिम आणि उत्तर भारतीय समाज बांधवांना एकत्र घेऊन शिवसेने मध्ये जोडण्याचा निश्चय केला आहे.

त्याचबरोबर मराठवाडा मध्ये मुख्यत्वे धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यातील विविध स्तरातील लोकांना जोडण्याचा विश्वास जाहीर केला.

” मा.दिलीप माने यांनी आजचा दिवस हा माझ्या राजकीय जीवनातील सगळ्यात आनंदाचा दिवस आहे ” असे मनोगत व्यक्त केले.

याचा उल्लेख करीत,

“तुमचा हा आनंदाचा क्षण तुम्हाला आयुष्यभर पुरेल आणि पश्चाताप करण्याची वेळ  कधीही  येणार नाही, याची मीं खात्री देतो.”

असे जाहीर मनोगत मा.उद्धव साहेबांनी व्यक्त केले.

“उद्धव ठाकरे एकटे पडलेत  असे विरोधकांना वाटत होते पण विरोधकांच्या आत्ता लक्षात आले की आमची ताकद सहस्त्रपटीने वाढली  आहे. विरोधकांना धडा शिकवण्यासाठी  जात, धर्म, पंथ  विसरून महाराष्ट्रासाठी  एकत्र आले पाहिजे. ही हुकूमशाही गाडून टाकली पाहिजे.” असे आवाहन उद्धव साहेबांनी  केले.

“भाजपा मध्ये मला काम करण्याची योग्य संधी न मिळाल्याने माझ्या सहकाऱ्यांबरोबर मी हा निर्णय घेतला”

असे दिलीप माने यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Show More
Back to top button
error: Content is protected !!