नाशिक: (प्रतिनिधी अनिकेत मशिदकर) जिल्हा पूर्व भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने रमाबाई आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले
गौरव पवार यांच्या हस्ते बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास व त्याग मूर्ती माता रमाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
जिल्हा कोषाध्यक्ष जयवंत निकम यांनी धूप पूजा केली वाल्मीक कापडे यांनी दीप प्रज्वलित करून सामुदायिक त्रिशरण, पंचशील घेण्यात आले. नाशिक जिल्हा पूर्व अध्यक्ष गौरव पवार, कार्यालयीन सचिव वाल्मीक कापडे, संस्कार सचिव यशवंत निकम यांनी त्याग मूर्ती माता रमाई यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास जयवंत निकम, डॉ मोतीराम पानपाटील, भगवान पानपाटील, रवींद्र निकम, मंगेश निकम, दीपक यशोद, शंकर खरे, आनंद मैराळे, दादाजी वाघ, विनोद थोरात, मोरे, लेखणी निकम आदी पदाधिकारी उपस्थित होते.