ताज़ा ख़बरें

जळगाव महानगरपालिकेचे दोन कर्मचारी ५ हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ अटक

पुन्हा एकदा लाच लुचपत विभागाची मोठी कारवाई


जळगाव शहरातील महानगरपालिकेचे दोन कर्मचारी लाच लुचपत विभागा ने आरोपी आनंद जनार्दन चांदेकर,वय-३७ वर्ष, व्यवसाय – नोकरी, लिपिक,महानगरपालिका जळगाव.रा,देविदास कॉलनी पंचमुखी हनुमान नगर च्या मागे,जळगाव.( वर्ग-३) व आरोपी राजेश रमण पाटील, वय ३५ वर्षे, व्यवसाय- नोकरी (शहर समन्वयक), मनपा,जळगाव( कंत्राटी कर्मचारी) रा.प्लाॅट नं.८, भुषण काॅलनी,गिरणा टाकीजवळ,जळगांव यांना ५ हजार रुपये लाच घेताना जळगाव लाच लुचपत विभागाकडून रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.

यातील तक्रारदार यांची कर सल्लागार संस्था असुन त्यांना एका संस्थेला नविन बसस्थानक, जळगाव येथील नव्याने बांधलेले आधुनिक वातानुकुलीत सार्वजनीक शौचालय पे अँन्ड युज तत्वावर चालविणेकरिता टेंडर भरणे व त्या संबधीत काम तक्रारदार हे करीत होते. त्याप्रमाणे दिनांक ०४/अप्रैल २०२५ रोजी सदर संस्थेतर्फे नविन बस स्थानक जळगाव येथील नव्याने बांधलेले आधुनिक वातानुकुलीत सार्वजनीक शौचालय पे अँन्ड युज तत्वावर चालविणेकरिता मिळणेकामी महानगरपालीका जळगाव येथे टेंडर दाखल केले होते. तसेच टेंडर करिता ३५ हजार रुपये अनामत रक्कम डी.डी.द्वारे महानगर पालीकेस भरली होती. परंतु सदरचे टेंडर सदर संस्थेला मिळाले नाही. म्हणुन टेंडर मिळणेकरिता भरलेली रुपये अनामत रक्कम परत मिळणेकरिता अर्ज तयार करून सदरचा अर्ज तक्रारदार यांनी दिनांक 29, जुलै 2025 रोजी महानगरपालीका जळगाव येथे जमा करून अनामत रक्कमेच्या कामा संदर्भात लोकसेवक श्री. आनंद चांदेकर, लिपीक, महानगरपालीका जळगाव यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी सदरची ३५ हजार रुपये अनामत रक्कम परत मिळुन देण्याकरिता तक्रारदार यांचेकडे ५ हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याबाबत तक्रारदार यांनी दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी .लाच लुचपत विभाग, जळगांव येथे तक्रार दिली होती. सदर तक्रारीप्रमाणे दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी लाचमागणी पडताळणी केली असता यातील आलोसे क्रमांक १ यांनी तक्रारदार यांचेकडे महानगरपालीकेत भरलेली अनामत रक्कम मिळुन देण्याकरीता ५ हजार रुपये लाचेची मागणी केली व सदरची लाचेची रक्कम आरोपी क्रमांक २ यांचेकडे देण्यास सांगितली. त्याचवेळी आरोपी क्रमांक.२ यांनी आलोसे क्रमांक.१ यांचेकरीता ५ हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार हे आलोसे क्रमांक.१ आनंद जनार्दन चांदेकर यांना भेटले असता त्यांनी मागणी केल्याप्रमाणे दिनांक.19 ऑगस्ट 2025 रोजी पंचांसमक्ष लाचेची रक्कम टेबलावर ठेवण्यास सांगुन स्वतः स्विकारली. म्हणून आरोपी क्रमांक १ यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.आरोपी क्रमांक.१ व २ यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

लाच लुचपत परिक्षेत्र नाशिक विभागीय पोलीस अधिक्षक श्री.भारत तांगडे व अपर पोलीस अधिक्षक श्री.माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शना खाली,जळगांव जिल्ह्याचे लाच लुचपत विभाग, पोलीस उप अधीक्षक,श्री.योगेश ठाकुर,सापळाचे प्रमुख पोलीस निरीक्षक श्री.हेमंत नागरे,सापळा पथकातील, पोलीस निरीक्षक बाळू मराठे, पोलीस कॉन्स्टेबल भूषण पाटील,वाहन चालक सुरेश पाटील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव या पथकाने ही मोठी कारवाई केली आहे.

Show More
Back to top button
error: Content is protected !!