
*आपली सुरक्षा करण्यासाठी मुलींनी भक्कमपणे उभे राहून अन्यायाविरोधात आवाज उठवावा – सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर*
*मुलींची सुरक्षा या विषयावर आ. बं. मुलींच्या शाळेतील विद्यार्थिनींबरोबर हितगुज*
चाळीसगाव विद्यार्थिनींची सुरक्षा या विषयावर सध्या सर्वच पालक चिंतेत असून शाळेत जाणाऱ्या आपल्या मुलींची चांगल्या प्रकारे सुरक्षा व्हावी काळजी घेतली जावी हा विषय आता सर्वत्र चर्चेत असतानाच यावर जागृती व्हावी म्हणून चाळीसगाव येथे आनंदीबाई बंकट हायस्कूल मधील विद्यार्थिनी बरोबर हितगुज साधण्यासाठी चाळीसगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर यांनी शिक्षक सामाजिक संघटना यांच्या प्रतिनिधींना बरोबर घेऊन आज संवादाचे आयोजन केले होते यात विद्यार्थिनींनी आपल्या सभोवताली असणाऱ्या लोकांना ओळखावे आपली सुरक्षा स्वतः कशी करता येईल यासाठी भक्कम व्हावे व गुडटच आणि बॅड टच ओळखून आपल्या पालकांशी या विषयावर मन मोकळेपणे बोलावे असे मार्गदर्शन केले यावेळी शाळेचे चेअरमन ऍडव्होकेट प्रदीप अहिरराव मुख्याध्यापिका इंगळे मॅडम बापजी हॉस्पिटलचे डॉक्टर संदीप देशमुख सौ विरजा देशमुख सह्याद्री प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष दिलीप घोरपडे, जिल्हा अध्यक्ष ऍडव्होकेट रणजीत पाटील हे उपस्थित होते
डॉ विरजा देशमुख यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधताना वाढत्या वयाबरोबर होणारे बदल व आरोग्य या विषयावर मार्गदर्शन केले तर डॉक्टर संदीप देशमुख यांनी आपल्या शैलित उपस्थित मुलींबरोबर मन मोकळ्या गप्पा मारल्या
सह्याद्री प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट रणजीत पाटील यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांचा आपल्यावर असलेला विश्वास सार्थ करावा तसेच समाजातील सामाजिक कार्यकर्ते पोलीस प्रशासन आपल्या सोबत भक्कमपणे उभे आहेत याची जाणीव ठेवून निडर व्हावे असे सांगितले
आ. बं. शाळेचे चेअरमन एडवोकेट प्रदीप अहिरराव यांनी या उपक्रमाचे कौतुक करत असताना शाळा प्रशासन व शिक्षक वृंद विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या विषयावर होत असलेल्या उपक्रमात संपूर्णपणे सहकार्य करेल असे आश्वासन दिले यावेळी इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी पर्यंतच्या ११०० विद्यार्थिनी उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सातपुते सर यांनी केले या उपक्रमातून विद्यार्थिनी स्वतःची काळजी घेतील व त्यांच्यामध्ये जागृती होईल ही अपेक्षा करण्यात येत आहे