ताज़ा ख़बरें

*ठाण्यात केंद्र सरकार व ईडी विरोधात काँग्रेस चे आंदोलन*

पत्रकार अरविंद कोठारी

मोदी सरकारने केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत द्वेषपूर्ण भावनेतून व सूडबुद्धीने ‘ नॅशनल हेरॉल्ड ‘ या वृत्तपत्राची मालमत्ता जप्ती साठी सुरू असलेली कारवाई तसेच काँग्रेसच्या नेत्या खा. सोनियाजी गांधी, लोकसभेचे विरोधी पक्ष नेते खा.राहुल गांधीं,अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सह इतर जेष्ठ नेते मंडळींवर सत्तेचा दुरुपयोग करून चार्जशीट दाखल करण्याच्या निर्णया विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण असून देशभरातील ईडी कार्यालयाबाहेर आंदोलने केली जात आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून या निर्णया विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या सूचनेनुसार ठाण्यात कोकण सहप्रभारी यु बी व्यंकटेश यांच्या नेतृत्वाखाली कोर्ट नाका येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस च्या वतीने आंदोलन करण्यात आले.यावेळी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली.
या प्रसंगी बोलताना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव,कोकण सहप्रभारी, यु बी व्यंकटेश म्हणाले की नॅशनल हेराल्ड प्रकरणात कोणताही घोटाळा झालेला नाही ही एक राजकीय दृष्टीने प्रेरित कारवाई आहे एका षडयंत्राचा भाग म्हणून गांधी कुटुंबाला लक्ष केले जात आहे. सत्य आणि न्यायाच्या बळावर आम्ही या लढ्याला सामोरे जाऊ.यावेळी काँग्रेस च्या शिष्टमंडळाने ठाणे जिल्हाधिकारी मा अशोक शिनगारे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
या आंदोलनात ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्यासह माजी खासदार कुमार केतकर,प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष संध्याताई सव्वालाखे,प्रदेश पदाधिकारी चंद्रकांत पाटील, संतोष केणे,ठाणे ग्रामीण अध्यक्ष दयानंद चोरघे,कल्याण शहर अध्यक्ष सचिन पोटे, उल्हासनगर चे अध्यक्ष रोहित साळवे, भिवंडी काँग्रेसचे अध्यक्ष अब्दुल रशीद ताहीर मोमीन ,ठाणे काँग्रेस चे प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्यासह संपूर्ण जिल्ह्यातील विविध फ्रंटल व सेलसह सर्व स्तरातील काँग्रेस पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Show More
Back to top button
error: Content is protected !!