ताज़ा ख़बरें

चाळीसगाव येथे ४९ महाराष्ट्र राज्य पुरूष हँडबॉल अजिंक्यपद स्पर्धा उद्घाटन

चाळीसगाव येथे ४९ महाराष्ट्र राज्य पुरूष हँडबॉल अजिंक्यपद स्पर्धा उद्घाटन

राज्यभरातून २८ संघ सहभागी; तीन दिवस स्पर्धेचे आयोजन

चाळीसगाव
हॅण्डबाॅल असोसिएशन महाराष्ट्र यांच्या मान्यतेने हॅण्डबाॅल असोसिएशन जळगांव व चाळीसगाव तालुका सर्व आजी माजी खेळाडू यांच्या संयुक्त विद्यमाने चाळीसगाव येथील बी.पी.आर्ट्स, एस.एम.ए.सायन्स के.के.सी.कॉमर्स आणि के.आर.कोतकर ज्युनिअर महाविद्यालयाचा हँडबॉल मदानावर सुरू असलेल्या ४९वी महाराष्ट्र राज्य पुरूष हॅण्डबाॅल अजिंक्यपद स्पर्धा २०२५ आयोजन दि.२४ ते २६ मार्च दरम्यान करण्यात आले आहे या स्पर्धेसाठी राज्यभरातील २८ संघ सहभागी झाले आहेत.
या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी मॅनेजिंग बोर्डेचे व्हा.चेअरमन योगेश भाऊ अग्रवाल होते.येथील राष्ट्रीय खेळाडू निखिल आगोने यांनी पेटती क्रीडा मशाल घेऊन आले यावेळी आजी माजी व युवा खेळाडू यांनी जल्लोष करत स्वागत केले व क्रीडांगणवर मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चा.ए.सोसायटीचे अध्यक्ष आर.सी.पाटील , उपाध्यक्ष मिलिंद देशमुख,कळंत्री विद्यालयाचे चेअरमन भोजराज पुन्शी,क्रीडा समितीचे चेअरमन योगेशभाऊ करंकाळ,चा.ए.सोसायटीचे सहसचिव प्रा.डॉ.मिंलींद बिल्दीकर हॅण्डबाॅल असोसिएशन महाराष्ट्र सचिव राजाराम राऊत ,हॅण्डबाॅल असोसिएशन इंडिया सहसचिव रुपेश मोरे,जळगाव जिल्हा हॅण्डबाॅल असोसिएशन अध्यक्ष सुरेश स्वार,राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक आर्किटेक्ट डी.वाय.चव्हाण सर , मुख्याध्यापक बा.बा.सोनवणे ,महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा.खुशाल देशमुख आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी मान्यवरांचा व पत्रकार यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात स्पर्धा आयोजन समितीचे सचिव बा.बा.सोनवणे यांनी केले.हॅण्डबाॅल असोसिएशन महाराष्ट्र सचिव राजाराम राऊत सर यांनी राज्यभरात होत असलेल्या हॅण्डबाॅल स्पर्धेचा धावता आढावा मांडत खेळाडूंना मार्गदर्शन केले.यानंतर चार.ए.सोसायटीचे व्हा.चेअरमन योगेश अग्रवाल यांनी अध्यक्षीय भाषणात खेळाडूंना मार्गदर्शन करत खेळासाठी सदैव मदतीसाठी तत्पर राहिलं असे आश्वासन दिले.यावेळी चाळीसगाव राष्ट्रीय खेळाडू अजितसिंह राजपूत तसेच चाळीसगाव येथील माजी राष्ट्रीय खेळाडू कल्पेश चौधरी,अर्जुन राजपूत,योगेश मांडोळे, तमाल देशमुख, प्रताप भोसले, सचिन स्वार,परेश पवार, क्रीडा शिक्षक पी.पी.पाटील, गुलाब चव्हाण, संदीप कुंटे, राहुल साळुंखे,शरद सुर्यवंशी,आदी व आजी,माजी खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.उदघाटनच्या पहिल्या दिवशी यवतमाळ वर्धा,परभणी धाराशिव,अहिल्यानगर, नांदेड, धुळे सिंधुदुर्ग,बीड, नंदूरबार, ठाणे, पालघर, नाशिक, अकोला,कोल्हापूर, रायगड आदी संघाचे रोमहर्षक सामाने झाले यात जळगाव,वर्धा,धाराशिव, अहिल्यानगर, नांदेड,बीड,ठाणे,सिंधुदुर्ग,यांनी विजयी सलामी दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व परिचय
प्रा.रवींद्र पाटील यांनी केला तर आभार महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा.खुशाल देशमुख यांनी मानले.

Show More
Back to top button
error: Content is protected !!