
तिर्थक्षेत्र देहू : तिर्थक्षेत्र देहू गावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
संतश्रेष्ठ तुकाराम यांचे 11 वंशज प्रसिद्ध व्याख्याते हभप शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना.
बुधवार सकाळी ८.३० च्या सुमारास आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आपले जीवन संपविले या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शिरीष महाराजांनी उचललेल्या टोकाच्या पावलाने देहू गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरीष महाराज यांचा मृतदेह सकाळी राहत्या घरात आढळून आला. राहत्या घरात त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने एकच खळबळ उडाली. शिरीष महाराज मोरे यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांना आणि सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
त्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे. संध्याकाळी 4 वाजता देहू गावातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.












