
पाचोरा : पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथील शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू !
पाचोराः दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथील शेतकरी असलेले रामा बळीराम ढमाले (पाटील) वय 47 यांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदर घटनेची माहिती घेतली असता रामा ढमाले हे त्यांच्या पत्नी, मुलगा सोबत त्यांच्या मालकीच्या शेतामध्ये काम करत असताना काहीतरी चावल्यासारखे जानवल्याने त्यानी त्यांची पत्नी यास संगितले व त्यानी जवळचे नातेवाईक असलेले श्रीराम ढमाले यांच्या मदतीने घरच्या मंडळींना सोबत घेऊन उपचारासाठी घेऊन येत असतांना यादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन मुले व एक सुन असा यांचा परिवार होता. खेडगाव नंदीचे परिसरातील दमाले परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच एकच गर्दी केली होती.