मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना मोठी गेमचेंजर ठरल्याचं बोललं जातंय.
आता अर्थसंकल्पिय अधिवेशनात पंधराशे रुपयांचे एकविसशे रुपये करण्याचा वायदा ही सत्ताधाऱ्यांनी केलाय.
मात्र त्यातच आता भाजप आमदार नितेश राणे यांनी लाडकी बहिण योजनेसंदर्भात मोठं वक्तव्य केलंय.
लाडकी बहीण योजनेच्या निकषांत बदल करा अशी विनंती मुख्यमंत्री फडणवीसांनी करणार असल्याचं नितेश राणेंनी म्हटलंय. दोन अपत्य असलेल्या बहिणींचाच योजनेत समावेश करण्याची मागणी नितेश राणेंनी केलीय.
0 2,513 Less than a minute