दि.३१/५/२०२४ ला लोणारा तहसील कळमेश्वर येथील एक मुलगी बेपत्ता झाल्याची घटना घडली. मुलीच्या घरच्यांनी पोलिस स्टेशन कळमेश्वर येथे तक्रार केली परंतु काहीही माहिती मिळत नव्हती. मुलीच्या घरच्यांनी सगळेच प्रयत्न करून सुद्धा काही सुगावा लागला नाही तर त्यांना कळमेश्वर येथील एका युवकाने युवासेना कळमेश्वर तालुका प्रमुख मंगेश भाऊ गमे यांच्याकडे जाऊन तक्रार करण्यास सांगितले. मुलीच्या घरच्यांनी मंगेश भाऊ गमे यांना भेट दिली व मुलीचे अपहरण झालेले आहे असे सांगितले. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस ठाणे गाठले व संपूर्ण यंत्रणा कामाला लावली व पोलिसांच्या मदतीने दिवसभरात आरोपींचा शोध लावून मुलीला सुखरूप त्यांच्या घरच्या लोकांपर्यंत पोहचवले.
2,506 Less than a minute