
लातूर रिपोर्टर.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. जळगावनंतर छत्रपती संभाजी नगरमध्ये त्यांची सभा पार पडली. त्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे असे दिग्गज नेते उपस्थित होते. तसंच लोकांचीही गर्दी मोठ्या प्रमाणावर झाली होती. यावेळी पंकजा मुंडे यांनी एक वाक्य म्हटलं. अमित शाह स्टेजवर असतानाच ते वाक्य त्या बोलून गेल्या. ज्याची चर्चा आता रंगली आहे.