ताज़ा ख़बरें

जळगावात पुन्हा सापडले एमडी ड्रग्ज , एक जण अटकेत , ६० हजाराचे सहा ग्राम ड्रग्ज जपत

जळगावात पुन्हा सापडले एमडी ड्रग्ज , एक जण अटकेत , ६० हजाराचे सहा ग्राम ड्रग्ज जपत

जळगाव : एलसीबी पथकाने मेहेरून परिसरातील शिवाजी उदयानात विक्रीसाठी आणलेल्या ६० हजार रुपये किमतीच्या ६ ग्राम एम डी ड्रग्जसह एकाला अटक केली. पथकाने सापळा रचून कारवाई केली. यावेळी दूसरा संशयित पळून गेला. याप्रकारणी एम. आय. डी. सी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

शहरात अमली पदार्थ चोरीछूपे सुरूच आहे उघडकीस आले. काही महिन्यांपूर्वी एम डी ड्रग्ज बाळगण्यावरती पोलीसांनी कारवाई केली होती. एलसीबी निरीक्षक राहूल गायकवाड यांच्या पथकाने माहिती मिळाल्यावर शिवाजी उघानातील जे, के पार्क स्विमिंग टॅकजवळ सापळा रचून छापा टाकला.

या छाप्यात मोहमद हनीप पटेल (वय:३५ रा. मास्टर कॉलनी ) याला पकडले. मोहमद कडून ६० हजाराचे सहा ग्राम पावडर २ मोबाईल आसा ८२ हजाराचे माल हस्तगत करण्यात आला आहे.

याप्रकारणी akram shaikh यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन्हीविरुद्ध एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Show More
Back to top button
error: Content is protected !!