थाणेमहाराष्ट्रमुंबई

हा तुमचा व्यक्तिदोष की…? रोहित पवार यांचा आशिष शेलार यांना खोचक सवाल

मुंबई, २ फेब्रुवारी २०२४ : रायगडच्या भूमीतून उद्धव ठाकरे यांनी बिल्किस बानोवर दया दाखवली. अखेर श्रीमान उद्धव ठाकरे यांनी बिल्किस बानो यांचा वकालतनामा घेतलाच…अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी करत उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावर सडकून टीका केली आहे. तर शेलारांसारखा मोठा नेता अत्याचार झालेल्या एका स्त्रीला धर्माचं लेबल लावतोय, असे म्हणत रोहित पवार यांनी निशाणा साधला तर हा तुमचा व्यक्तिदोष आहे की पक्षाची संस्कृती? असा सवालही रोहित पवार यांनी केला. ‘अखेर श्रीमान उध्दव ठाकरे यांनी बिल्किस बानो यांचा वकालतनामा घेतलाच…! रायगडच्या भूमीतून केलेल्या भाषणात बिल्किस बानोवर दया दाखवलीच…!! वा! आम्ही सकाळीच म्हटले होते. रायगडमध्ये हिरवे झेंडे फडकवितच दौरा करणार…! आता रायगडमधेच आहात तर हसीना पारकर यांच्या काही मालमत्ता आहेत का? त्याचीही एकदा चौकशी करुन.. बघून या!!’, असे ट्वीट शेलारांनी केलं तर निषेध व्यक्त करत रोहित पवार म्हणाले, आशिष शेलार काही मोजक्या अभ्यासू नेत्यांपैकी आपल्याकडं पाहिलं जातं, परंतु तरीही अत्याचार झालेल्या एका स्त्रीला तुमच्यासारखा वकील आणि मोठा नेता धर्माचं लेबल लावत असेल तर हा तुमचा व्यक्तिदोष आहे की पक्षाची संस्कृती? असा सवालच केला.

Show More
Back to top button
error: Content is protected !!