शिर्डी : साई प्रसादालयात मोफत जेवण बंद करा भाजपचे माजी खासदार सुजय विखेंची मागणी
शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या मोफत जेवणावर माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांच्या मते, यामुळे शिर्डीत भिकारींची संख्या वाढली आहे.
हा निधी मुलांच्या शिक्षणासाठी वापरावा अशी त्यांची मागणी आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विविध राजकीय पक्षांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
साई संस्थानकडे मोठा निधी असल्याचे सांगितले जात असतानाच, विखे पाटील यांच्या मागणीला काहीजण पाठिंबा देत असून काहींनी विरोधही केला आहे.शिर्डीतील साईबाबा संस्थानने मोफत जेवण बंद करावं. फुकट जेवणामुळे महाराष्ट्रातील भिकारी येथे गोळा झाले आहेत.
हे पैसे मुलांच्या भवितव्यासाठी, शिक्षणासाठी खर्च करावे, अशी मागणी माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केलीय. प्रसंगी यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली
2,538 Less than a minute