.
चाळीसगाव
– परभणी येथे भारतीय घटनेचे शिल्पकार, संविधान निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करुन विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी व तुरुंगात टाकावे अशी मागणी चाळीसगांव तालुक्यातील समस्त आंबेडकरी कार्यकर्ते तथा युवा भीमसैनिक, आंबेडकर प्रेमी यांनी निवेदनाद्वारे दि 13/12/2024 रोजी तहसीलदार प्रशांत पाटील व पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की परभणी येथे संविधानाची प्रतिकृतीची तोडफोड करून विटंबना केल्याबद्दल चाळीसगाव सह संपूर्ण महाराष्ट्रातील आंबेडकरी अनुयायी या संविधान प्रेमी जनतेत संतापाची लाट उसळली आहे, महाराष्ट्रात मागील काही वर्षांपासुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधान विटंबनेचे प्रकार वारंवार घडत असुन समाजकंटकांवर शासनाचा मुळीच वचक राहिलेला नाही. अशा घटनांमुळे आंबेडकरी अनुयांयामध्ये असुरक्षतेची भावना निर्माण झाली असून अशा घटना घडण्यामागे आणि त्यांना सरंक्षण देण्यामागे मनुवादी व जातीयवादी शक्तींचा हात असुन महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था पुर्णपणे धोक्यात आली आहे. तसेच राज्यातील दलित आणि अल्पसंख्यांक पुर्णपणे धास्तावले असुन शासन समाजकंटकांना पाठीशी घालुन अशा घटनांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्याची भावना निर्माण होत आहे. अशा समाज विघातक शक्तींचा व या गुन्हात सहभागी असलेल्या सर्वांना तात्काळ अटक करण्यात यावी.
अशी मागणी करत
आम्ही संविधानाचे सरंक्षक आहोत आणि संविधावर निष्ठा बाळगतो म्हणुन हिंसक मार्गाचा अवलंब करत नाही याचा जास्तच फायदा मनुवादी सरकार घेत आहे व राज्याचे गृहमंत्री यांनी बघ्याची भुमिका घेवू नये अन्यथा आम्हाला साम, दाम, दंड, भेद या चतुर्नितीचा अवलंब करून योग्य तो न्याय मिळवुन घ्यावा लागेल म्हणून आमच्या सहनशक्तीचा फायदा शासन आणि प्रशासनाने घेउ नये अन्यथा देशात अराजकता निर्माण होईल म्हणुन कायदेशीर मार्गाने लवकरात लवकर आरोपींवर कारवाई करून आरोपीना तुरुगांत डांबावे व असे प्रकार घडू नये यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे.
निवेदनावर नगरसेवक रामचंद्र जाधव, रोशन जाधव, फकिरा मिर्झा, गौतम जाधव, सागर निकम, स्वप्नील जाधव, मुकेश नेतकर, सुरेश पगारे, ऍड आकाश पोळ, ऍड प्रेम निकम, नितीन मरसाळे, सोनू अहिरे, दिनेश मोरे, देविदास जाधव, वसीम चेअरमन, गोगा शेख, शरद जाधव, बबलू जाधव,
महेंद्र पटाईत, संदीप केदार, सोमनाथ चौधरी, अमोल पगारे, चेतन झाल्टे, सागर जवराळे, महेंद्र बिऱ्हाडे, तुकाराम जाधव आदी आंबेडकर प्रेमी उपस्थित होते.