सोमेश मुळे:शहरातील लक्ष्मी नगर परिसरातील राहणाऱ्या चाळीस वर्षीय कमल विक्रम डोंगरे यांनी शनिवारी 30 नोव्हेंबर रोजी विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या केली त्यांना तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकारणी एमआयडीसी पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
सविस्तर माहिती आशी आहे की मयत कमल डोंगरे हे एमआयडीसीतील एका कंपनीत काम करत होते त्याच्या आत्महत्ये मागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पोलीस हेडकॉन्स्टेबल कपूर तडवी यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू आहे या घटनेने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.