Lok Sabha Chunav 2024Uncategorizedअन्य खबरेताज़ा ख़बरें
Trending

लाचेची मागणी करीत असताना लाचलुचपत विभागाकडून अटक

ॲंटी करप्शन ब्यूरो,अमरावती
दिनांक:-24/05/2024

तक्रारदार यांनी दिनांक 28/03/2024 रोजी तक्रार दिली की ,त्यांचे वडिलांचे नाव असलेले शेतीचे वाटणीपत्रानुसार फेरफार करणे बाबतचा आदेश काढून देनेकरिता श्री.किरण बेलसरे लिपिक,तहसील कार्यालय चांदूरबाजार जि. अमरावती यांनी स्वतः करीता व श्रीमती गरड यांच्याकरिता 25000/- करीता लाचेची मागणी करीत होते.
सदर तक्रारीवरून दीं.28/03/2024 रोजी करण्यात आलेली पडताळणी दरम्यान श्री.किरण बेलसरे यांनी तडजोडी अंती 20000/- लाचेची मागणी करून स्विकारण्याचे मान्य केले.तसेच 08/05/2024 रोजी कऱण्यात आलेली पडताळणी दरम्यान श्रीमती गीतांजली गरड,तहसीलदार चांदूरबाजार जिल्हा अमरावती, खाजगी इसम यांना लाच देण्यास प्रोत्साहन असल्याचे निष्पन्न झाले.
वरून दोन्ही आरोपीविरुद्ध चांदूरबाजार पोलिस स्टेशन, अमरावती ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम1988 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही मारुती जगताप पोलिस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,अमरावती परिक्षेत्र , अनिल पवार, मिलिंदकुमार बहाकर, मंगेश मोहोळ, उप पोलिस अधीक्षक श्रीमती विजया पंधरे,श्रीमती चित्रा मेसरे, प्रमोद रायपुरे,नितेश राठोड, महेंद्र साखरे, उमेश भोपटे, निलेश जयले, ला.प्र.वी अमरावती चालक सपोउनि बारबुधदे यांनी पार पडली.

Show More
Back to top button
error: Content is protected !!