प्रतिनिधी -अनिकेत मशिदकर -मालेगाव : भरधाव वेगात जाणाऱ्या एका खाजगी प्रवाशी बस पलटी होऊन झालेल्या दुर्घटनेत चाळीस हून अधिक प्रवाशी जखमी झाले. मनमाड मालेगाव रस्त्यावरील वराणेपाडा गावाजवळ सोमवारी साडे आठ वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला.
पुणे येथून मालेगाव कडे येणारी एआर ०१ एक्स ०३०७ या बसचा स्टिअरिंग रॉड तुटल्याने ती रस्त्यावर पलटी झाली. यात बस मधील चाळीस हून अधिक प्रवाशी जखमी झाले. त्यातील आठ जणांना गंभीर इजा झाल्याने त्यांना खाजगी तसेच सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुदैवाने या अपघातात जीवीत हानी झाली नाही. दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच वराणेपाडा ग्रामस्थांनी अपघात स्थळी धाव घेत जखमी प्रवाशांना बस मधून बाहेर काढून तालुका पोलिसांच्या मदतीने उपचारासाठी सामान्य रूग्णालयात तसेच खाजगी रूग्णालयात दाखल केले.