
“माता रमाई आंबेडकर जयंती” दिनांक०७/०२/२०२४ रोजी डोंबिवली शहरात मोठ्या प्रमाणात बहुजन वर्ग एकत्रित होऊन अति उत्साहाने माता रमाई आंबेडकर यांची जयंती ढोल ताशे यांच्या गजरात नाचत गाजत शिस्तबद्ध भव्य रॅली काडून माता रमाई यांना अभिवादन करण्यात आले,ह्या जयंती उत्सवात डोंबिवली शहरातील पूर्वेस असणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ मोठया संख्येने महिला एकत्र येऊन माता रमाई यांच्या वर आधारित गाणे गाऊन जयंती साजरी करण्यात आली, सर्व संघटना यांनी उत्सव साजरा करण्यास मोठे परिश्रम घेतले.