नाशिक/कळवण, प्रतिनिधी -अनिकेत मशिदकर : किड्स लर्निंग स्कूल, सिद्धिविनायक सेमी स्कूल व टी. एन. रौंदळ ज्युनिअर कॉलेज येथे मातृ पितृ दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला.
दि.१४ फेब्रुवारी हा दिवस मातृ-पितृ दिन म्हणून साजरा करण्यात आला. ‘व्हॅलेंटाईन डे’ ऐवजी या दिवशी स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या आई आणि वडिलांना स्कूलमध्ये विशेष आमंत्रित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचे स्वागत करत, औक्षण करत, पाय धुवून, पाया पडत आशीर्वाद घेतले. विद्यार्थ्यांना आई-वडिलांचे आपल्या जीवनातील महत्व यावेळी अधोरेखित झाले.
आई वडील- मुले यांच्या नात्याचे महत्त्व सुचित्रा रौंदळ यांनी विशद केले. याप्रसंगी विभाग प्रमुख मनीषा वाघ, कांचन पगार, रीना पाटील, दर्शना पाटील, कविता पवार, श्वेता शिंदे, सुरेखा ठाकरे, संगीता नावरकर, धनश्री वाणी, तेजस्विनी पगार, कविता आहेर, विद्या पाटील, रोहिणी हिरे, सुवर्णा काकुस्ते, भावना पाटील, भाग्यश्री येशी, रूपाली जाधव, बांगर मॅडम, कांचन देवघरे, वैशाली चाटे, जयश्री आहेर, वैशाली मोरे, माधुरी रौंदळ, सोनाली पाटील आदी उपस्थित होते.