अमृत कौशल्य (प्रशिक्षण) योजनांचा दुर्लक्षित समाजातील लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा – अमृतचे जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र कानडे यांचे आवाहन


चाळीसगाव-येथे ज्या समाजास आजपर्यंत कोणतेही आर्थिक लाभमिळालेले नाही, अशा समाजासाठी महाराष्ट्र शासनाने अमृत स्वायत्त संस्था निर्माण केली आहे, या संस्थेचे कार्य व त्याची माहिती देण्यासाठी शासनाच्या सवलती ज्या समाजांना मिळत नाहीत, त्या दुर्लक्षित घटकांना माहिती देण्यासाठी मेळावा घेण्यात आला होता.




या मेळाव्यात सवलती नसलेले ओपन कॅटेगिरीतील आर्थिक दुर्बल घटक समाज सुधारणार्थ ब्राह्मण, हिंदू राजपूत, अग्रवाल, गुजराती, बंगाली, कायस्थ, सिंधी इत्यादी समाज या योजनेंतर्गत लाभ घेऊ शकतात, लाभार्थ्यांचे आर्थिक उत्पन्न आठ लाखाच्या आत आहे की, जो ई डब्ल्यू एस या योजनेत येतो, तसेच तो भारताचा किंवा महाराष्ट्राचा रहिवासी असून ज्याच्याजवळ पॅन कार्ड,डोमिसाईल सर्टिफिकेट, लिविंग सर्टिफिकेट,उत्पन्नाचा दाखला, तहसीलदार यांचे डोमिसाईल सर्टिफिकेट आहे, असे लोक या योजनेत भाग घेऊ शकतात, अशी माहिती अमृत योजनेचे जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र कानडे यांनी दिली आहे. ही कागदपत्र आवश्यक असून या योजनेअंतर्गत अनेक छोटे व्यवसायांचे प्रशिक्षण अमृत संस्था अमृत कौशल्य या अंतर्गत तालुब्याच्या ठिकाणी सुरू करत असून युवा युवती, यांना निशुल्क सहज प्रशिक्षण उपलब्ध होणार आहे. या व्यवस्थे अंतर्गत व्यवसायास लागणारे कर्ज लाभधारकाने बँके कडून स्वतः उपलब्ध करावे, पण त्याचे १२% दराचे व्याज व्यक्तीक व्याज परतावा शासनाकडून मिळणार आहे, अशी देखिल माहिती दिली आहे.चाळीसगाव च्या इंदिरा गांधी सिंधी हायस्कूल येथे पार पडलेल्या या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रीतमदास रावलानी हे होते.या वेळी अमृत संस्थे चे उपजिल्हा व्यवस्थापक दीपक गुप्ता यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. या मेळाव्यात सिंधी समाज चे युवक,युवती महिला व पुरुष जनरल घटकातील आर्थिक दुर्बल गरजू मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार नारायण जेठवानी,लक्ष्मण नागवाणी, रोशन मखिजानी, जयकुमार पंजाबी, ओमप्रकाश बजाज, जितेश तलरेजा हे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासा साठी लक्ष्मण नागवाणी यांनी परिश्रम घेतले.


चाळीसगाव येथे अमृत कौशल योजनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कानडे व उपजिल्हा व्यवस्थापक दीपक गुप्ता यांचा योजनेचे लाभार्थी यांनी सत्कार केला.














