
*रोटरी हि नेतृत्वाची शाळा, समाजाप्रती कटिबद्ध असलेली जागतिक सामाजिक संस्था – मा. आमदार दादासो. मंगेश जी चव्हाण यांचे गौरवोद्गार…*
दि. 28 जून 2025 शनिवार रोजी सायंकाळी 6:30 वाजता अरिहंत मंगल कार्यालय येथे रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव रॉयल्स चा नूतन कार्यकारिणीची पदग्रहण सोहळा अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्ष *ठाणे येथे स्थित रोटरी डिस्ट्रिक्ट 3142 चे माजी प्रांतपाल रोटे मिलिंद जी कुलकर्णी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.आमदार मंगेश दादा चव्हाण , मा. रोटे. डॉ. राजेश पाटील (पुढील डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डिस्ट्रिक्ट 3030) आणि रोटरी लर्निंग इन्स्टिटयूट चे रोटे. सीएम बेंद्रे ( ठाणे ), असिस्टन्ट गव्हर्नर रोटे किरण देशमुख , बापजी हॉस्पिटल चे संचालक रोटे डॉ संदीप देशमुख तसेच प्रदीप दादा देशमुख यांची प्रमुख उपस्थित लाभली*
कार्यक्रमाचे मावळचे अध्यक्ष रोटे. डॉ.स्वप्निल शिंदे यांनी आपला कार्यकाळ संपवून पदभार नूतन अध्यक्ष रोटे. डॉ. विरजा देशमुख यांच्याकडे सुपूर्त केला तसेच त्यांनी त्यांच्या मनोगतात मागील वर्षी केलेल्या प्रकल्पांचे माहिती दिली तसेच नूतन अध्यक्ष रोटे.डॉ. विरजा देशमुख यांनी पदभार स्वीकारतेवेळी आपले मनोगत व्यक्त केले त्यात त्यांनी येत्या 5 जुलै 2025 रोजी फेको मशीन द्वारे भव्य मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले असून बापजी हॉस्पिटल चाळीसगाव येथे रोटरीच्या माध्यमातून भव्य रोटरी रॉयल्स आय केअर सेंटर उभे राहत असल्याचे सांगितले. तसेच वालझिरी येथे सौर ऊर्जा प्रकल्प या वर्षात करण्याचे मनोगत बोलून दाखविले तसेच मावळते सचिव रोटे.संदीप चव्हाण यांनी सचिव पदाची सूत्रे रोटे. ऋषभ सुराणा व रोटे. भरत दामा यांच्याकडे सुपूर्द केली.
माननीय आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी आपल्या मनमोकळ्या भाषणात रोटरी क्लबला नेतृत्वाची शाळा असे गौरोदगार देऊन क्लबच्या कार्याचे कौतुक केले त्यांनी स्वतः रोटरी सदस्यत्व स्वीकारले आणि सांगितले की लोकप्रतिनिधी तर आहेच पण खऱ्या समाजसेवकाच्या भूमिकेतून परिवर्तनासाठी पुढाकार घेणे ही खरी जबाबदारी आहे.
डॉ.राजेश पाटील यांनी 4 Way Test चा उल्लेख करत सांगितले की रोटरी ही संस्था सत्पात्री दानाचा उत्तम मार्ग असून जागतिक स्तरावर समाजसेवेच्या माध्यमातून ओळख निर्माण करीत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष रोटे.मिलिंद कुलकर्णी यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात सांगितले की रॉयल्स म्हणजेच रॉयल थाट असं म्हणत रोटरीच्या 120 वर्षाच्या सेवेचा गौरव केला आणि हिंदू धर्मातील विविध देवपूजेसारखा दृष्टिकोन मांडून सदस्यता वाढ, लोक कल्याणकारी प्रकल्प ,फेलोशिप म्हणजे रोटरीचा आत्मा, टीआरएफ साठी योगदान या चार बाबींवर भर देण्याचे आव्हान केले.
कार्यक्रमात एक सुंदर कविता रोटे.सीएम बेंद्रे यांनी सादर केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध सूत्रसंचालक तथा प्राध्यापक विजय गर्गे सर यांनी आपल्या खास शैलीत केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अंकिता वृषभ सुराणा यांनी केले.
यावेळी कार्यक्रमास समाजातील विविध कार्यक्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मच्छिन्द्र भाऊ राठोड, जेष्ठ पत्रकार किसनरावजी जोर्वेकर, एम बी पाटील, नगरसेवक रामचंद्र जाधव , दिपक पाटील, शशिकांत धामणे , मधुकर कासार , राजेंद्र कटारिया , प्रदीप देशमुख , योगेश भोकरे , श्रीकृष्ण अहिरे, रवींद्र शिरुडे , डॉ प्रशांत शिनकर , डॉ नितीन देवरे असे व इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव , मिल्कसिटी संगम , मनमाड मॅजिक , तसेच जळगाव वेस्ट क्लब चे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी रोटरी चाळीसगाव रॉयल्स चे हर्षद ढाके , हरेश जैन , अल्पेश बागड , राज पुन्शी , दिलीप पवार , डॉ प्रियंका खेडकर , अंजली शिंदे, कविता चव्हाण , नीरज कोतकर , सुधन्वा कुलकर्णी , तमाल देशमुख , महेंद्र वर्मा ,पराग बढे , आनंद पाटील , विनायक ठाकरे , बाळासाहेब गोपाळ , पूजा भामरे यांनी कार्यक्रम संपन्नतेसाठी विशेष मेहनत घेतली.