
सर्वांना मानाचा जय शिवराय
आजचा सोन्याचा दिवस आजच्या दिवशी म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी आपल्या पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्यावर तेजस्वी सूर्याचा जन्म झाला जिजाई पोटी शिवबा जन्माला आले.
पुढे जाऊन हेच आपल्या हिंदवी स्वराज्याचे पहिले छत्रपती झाले,
आजही आपण म्हणतो ज्यांच्या पदस्पर्शाने पावन झाली ही महाराष्ट्र भूमी त्यांच्या नावाने फुगते आमची गर्वाने छाती अश्या माझ्या शिवबा राजाचा आज जन्म झाला आणि त्या दिवसापासून पुढे नेहमी रयतेसाठी दिवसरात्र एक करून राजांमुळे आपल्या रयतेला मुघलांच्या त्रासातून सुटका मिळाली…
आजचा दिवस संपूर्ण सृष्टी साठी आनंदाचा सोहळा आहे हाच दिवस खोपोली पासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या आडोशी या गावी हनुमान मित्र मंडळ आडोशी द्वारे
•शिवजन्म• दिवस म्हणून अतिशय उत्साहाने साजरा केला गेला..
दिवसाची सुरुवात महाराजांना मानवंदना करून झाली,
यात गावातील अनेक नवतरुणांनी सहभाग घेतला, अनेक सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती यात सहभागी झाले, आमच्या गावातील जिजाऊंच्या लेकी सुद्धा आवर्जून या सोन्याची दिवशी उपस्थित राहिल्या.
गावातील शालेय विद्यार्थी वर्गाने चित्रकला स्पर्धेत सहभाग दाखवून आपल्या कलेला जागृत केल..
गावातील रणरागिणी प्रतीक्षा देशमुख मानसी झुंजारराव यांनी सुंदर अशी रांगोळी काढून सर्वांचे मन प्रसन्नीत केल.
गावातील नवीन पिढीतील जिजाऊच्या लेकी शिवण्या सोमनाथ देशमुख – नेहा किशोर देशमुख –
त्याच सोबत गावातील प्राथमिक शाळेतील मुख्याधपिका -वर्गशिक्षिका यांची त्यांच्या विध्यार्थी वर्गसोबत असलेली उपस्थिती मोलाची लाभली, प्रत्येक तरुणांना आपल्या महाराजांची कीर्ती समजून घेऊन भविष्यासाठी राजांसारखं कणखर बनण्याची प्रेरणा मिळाली..
या शुभदिन प्रसंगी खोपोली पोलीस स्टेशन चे (साहेब)
उपस्थित राहिले,
आणि गावाचा हा जल्लोष पाहून छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सोबत असल्याचा भास झाला आणि राजांचा जन्मदिन आनंदात साजरा झाला
यासाठी हनुमान मित्र मंडळ आडोशी,
ग्रामपंचायत आडोशी आतकरगाव
आणि प्रत्येकाचं आभार कि आपल्या सहभागाने आपल्या राजांना पुन्हा एकदा आनंदात पाहण्याचा योग आला 🙏
धन्यवाद