ताज़ा ख़बरें

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे पुरस्कार.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

नागरी प्रश्नांची सोडवणूक करण्याकरिता त्यांनी केलेल्या कार्याची नोंद महाराष्ट्रातील इतिहासात निश्चित राहील,

मा. शरदचंद्रजी पवार यांच्याकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुतीसुमनांची उधळण.

दिल्ली : विराम पवार

नवी दिल्ली : साताऱ्याचे सुपुत्र यशवंतराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि आता एकनाथ शिंदे यांना राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. एकनाथ शिंदे यांनी केवळ राज्याचे नेतृत्व केले नाही तर वेगवेगळ्या क्षेत्रात महाराष्ट्र पुढे कसा जाईल हे त्यांनी आवर्जून पाहिले. नागरी प्रश्नांची जाण असणारा नेता कोण याची यादी काढल्यास एकनाथ शिंदे यांचे नाव कटाक्षाने घेतले जाईल, अशी स्तुतीसुमने ज्येष्ठ नेते मूळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उधळली.
मी देखील साताऱ्याचा मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री सातारचे होते. यशवंतराव चव्हाण पृथ्वीराज चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांना राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. एकनाथ शिंदे यांनी सातारच्या भूमिपुत्रांची यादी वाचून दाखवली पण ती यादी अपुरी आहे. कारण त्या यादीत माझे नाव नाही. मी देखील मूळचा सातारा जिल्ह्यातील नांदवळ गावचा रहिवासी आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.
ठाणे नवी मुंबई आणि मुंबई हा सगळा नागरी भाग आहे. अलीकडच्या ५० वर्षात नागरी प्रश्नांसंबंधी जाण असलेला नेता कोण याची माहिती घेतली असता एकनाथ शिंदे यांचे नाव कटाक्षाने घ्यायला लागेल. महानगरपालिका राज्य सरकारमध्ये काम करताना त्यांनी नेहमीच नवी दिशा दाखवली. हे काम करीत असताना कोणताही पक्षीय अभिनिवेश न ठेवता नेहमी सहकार्याची भूमिका त्यांनी घेतली. नागरी प्रश्नांची सोडवणूक करण्याकरिता त्यांनी केलेल्या कार्याची नोंद महाराष्ट्रातील सार्वजनिक इतिहासात निश्चित राहील, असे गौरवोद्गार पवार यांनी काढले.

Show More
Back to top button
error: Content is protected !!