अभिनेत्री ममता कुलकर्णी महामंडलेश्वर बनण्यावरून वाद वाढला.
जगद्गुरू महामंडलेश्वर हिमांगी सखी यांची नाराजी.मुंबई प्रतिनिधी
अभिनेत्री ममता कुलकर्णीच्या महामंडलेश्वर बनण्यावरून वाद वाढला आहे. *किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर हिमांगी सखी* यांनी त्यावरून अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत.
ममता कुलकर्णी अचानक भारतात आली आणि अचानक तिला महामंडलेश्वर बनवण्यात आले हे अत्यंत चुकीचे आहे असं त्या म्हणाल्या.
महाकुंभमध्ये अभिनेत्री ममता कुलकर्णीने संन्यास घेतला. ती किन्नर अखाड्याची महामंडलेश्वर बनली. मात्र तिच्या महामंडलेश्वर बनण्यावरून वाद सुरू झाला आहे. ममता कुलकर्णीचं डी-कंपनीशी कनेक्शन होते , ड्रग केसमुळे ती जेल मध्ये गेली होती अशा महिलेला महामंडलेश्वर पदी बसविल्या बद्दल *जगतगुरु महामंडलेश्वर हिमांगी सखी यांनी नाराजी व्यक्त केली आहे,* कोणतीही चौकशी न करता तिला महामंडलेश्वर का बनवलं गेलं, असा सवाल त्यांनी केला आहे. इतकंच नव्हे तर किन्नर अखाडा हा किन्नरांसाठी आहे, मग त्यात एका महिलेला जागा का दिली, असंही हिमांगी सखी यांनी विचारलंय. ती ड्रग्जच्या आरोपाखाली तुरुंगातही गेली होती. ही गोष्ट संपूर्ण जगाला माहीत आहे. तरीसुद्धा तुम्ही तिला दीक्षा देऊन महामंडलेश्वरचं पद देता. तेसुद्धा कोणत्याही शिक्षेशिवाय. एखाद्याला तुम्ही दीक्षा देऊन इतक्या मोठ्या पदावर बसवता तेव्हा तुम्ही कोणत्या प्रकारचा गुरू समाजाला देत आहात, हे मला जाणून घ्यायचं आहे.
2,506 1 minute read