प्रेस नोट
प्रतिनिधि नागपूर
*अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, रामटेक नगर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व नूतन कार्यकारणी घोषित करण्यात आली.*
आज अभाविप रामटेक नगर 2024-25 कार्यकारणी ची घोषणा करण्यात आली. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला, या कार्यक्रमांमध्ये प्रमुख वक्ते म्हणून मा. मनोज जी साबळे, वर्धा व (यवतमाळ विभाग संघटन मंत्री) तसेच निर्वाचन अधिकारी म्हणून प्रा.डॉ.सुशील लोणकर सर आणि रामटेक जिल्हा संयोजक अक्षय वाणी हे उपस्थित होते. यात अनेक विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच नगर मंत्री म्हणून रितीक आकरे याला जबाबदारी देण्यात आली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकूण १०० गुणवंत विद्यार्थ्यांचा व विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमा मध्ये एकूण २५० लोकं उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगर कार्यकारिणीने परिश्रम घेतले.
वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज नागपूर
रिपोर्टर देवाशिष टोकेकर