*💥 आताची ब्रेकिंग मोठी न्यूज, 💥*
प्रतिनिधी नागपूर
*अखेर आज दीक्षाभुमी नागपूर प्रकरणात आपल्या कर्तव्यात कसूर केल्यामुळे ,दोषी अधिकारी, त्यामध्ये आरोपी मा. विभागीय आयुक्त नागपूर IAS, तसेच मा.विभागीय पोलिस सह आयुक्त नागपूर IPS,मा.जिल्हाधिकारी नागपूर IAS,मा. उपविभागीय अधिकारी नागपूर, मा.तहसीलदार नागपूर, मा.ठानेदार बजाज पोलिस स्टेशन नागपूर, मंडळी अधिकारी नागपूर, तलाठी लेंढरा,डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सर्व पदाधिकारी (भंतेजी सोडून), मा.ठानेदार वरोरा,मा उपविभागीय पोलिस अधिकारी वरोरा IPS,मा.पोलिस जिल्हा पोलिस अधीक्षक IPS,सह २४ आरोपी विरुद्ध ई-फायलींग फौजदारी पीटिशन, दस्तऐवज १ ते ५२ पुराव्यानिशी दाखल झाली आहे,*
*ऑनलाईन आरोपी यांचे नावे उपलब्ध आहेत तुम्ही पाहू शकता विनोदकुमार खोब्रागडे विरुद्ध YFC कंपनी व इतर पहा*
*अखेर आज”दीक्षाभुमी “नागपूर सरकारी रेकॉर्ड वर नावाने करन्यासाठी ,व दोषींवर फौजदारी कारवाई करन्यासाठी नवीन कायदा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ अधिनियम ४६ नुसार न्यायालयात खटला दाखल केला आहे*
*भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३अधिनीयम ४६ चां कलम १४१नुसार पीटिशन दाखल झाली आहे,कलम १९९नुसार प्रत्येक जिल्ह्यात पीटिशन दाखल करता येते,व उच्च न्यायालयात अनुच्छेद २२६ नुसार पीटिशन आपनही दाखल करु शकता.*
*भारतीय न्याय संहिता २०२३ अधिनियम ४५ चां कलम ६१(२)१९९,२९८,३१६(५),३१८(४),३३५,३३६(३),३४०(१),३(५), नुसार FIR रजिस्टर करन्याची मागणी न्यायालयात केली आहे*
*तसेच सार्वजनिक मालमत्ता हानीस प्रतिबंध कायदा अधिनियम १९४८कलम ३ नुसार दीक्षाभूमी नागपूर ला विद्रुपीकरण केल्यामुळे कलम ३ नुसार कारवाई करण्याची मागणी न्यायालयात केली आहे*
*तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८चा कलम १३(२) नुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे*
*तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा १९८९सुधारणा २०१५ नुसार महसुल अधिकारी व नझुल भुमापन अधिकारी यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्यामुळे कलम ४ व ३(१)(t) नुसार जे अनुसूचित जातीचे नाही त्यांचावर फौजदारी कारवाई करायची मागणी सदर पीटिशन न्यायालयात मध्ये केली आहे*
*ज्याअर्थी महाराष्ट्र शासनाने दिनांक १५/ऑगष्ट/१९६१ मध्ये दीक्षाभूमी नागपूर चा ताबा भारतीय बौद्ध महासभा यांना दिला, होता ,मात्र विभागीय आयुक्त नागपूर यांनी शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे*
*दिनांक ३१/०३/२०१८ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उप मुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दीक्षाभूमी नागपूर साठी १००करोड दिले, नंतर २००करोड रुपये दिले*
*आणि तहसीलदार नागपूर यांनी २०१९ मध्ये शासनाचे उल्लंघन करून दीक्षाभूमी नागपूर चां जमिनीला झुडपी जंगल सडक रस्ते इमारत पड शेती असे दाखविले आहे*
*हे सर्व महसूल अधिकारी व स्मारक समितीचे पदाधिकारी ७० वर्षांपासून 🙈🙊🙉 चुपचाप पाहत होते व आजही पाहात आहे*
*पोलिस प्रशासन यांना पुराव्यानिशी गंभीर तक्रार देऊनही त्यांनी सुद्धा बघाची भुमिका घेतली व आपल्या कर्तव्यात कसूर केले आहे*
*वास्तविक १५/०८/१९६१ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब यांनी सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांना दीक्षाभूमी नागपूर ची १४ एकर जमीन भारतीय बौद्ध महासभा यांना ताबा दिला होता, मात्र काही बदमाश लोक तत्कालीन विभागीय आयुक्त नागपूर यांना भेटून दीक्षाभूमी नागपूर भारतीय बौद्ध महासभा या नावाने सरकारी रेकॉर्ड तेव्हा ही होऊ दिला नाही व आजही नावाने सरकारी रेकॉर्ड ७/१२ व आखीव पत्रिका मध्ये दीक्षाभूमी नागपूर हे नाव नाही*
*काही बिन डोक सेवानिवृत्ती झालेले, उच्च पदावर IAS अधिकारी राहीलेले हे सुध्दा समाजाला गुमराह करत होते व आजही करीत आहे,व उडवाउडवीची उत्तरे देत आहेत,हे बरोबर नाही*
*विद्यमान डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती बोगस, भ्रष्टाचारी, विस्वासघात करनारी असल्यामुळे,७० वर्षांपासून दीक्षाभूमी नागपूर सरकारी रेकॉर्ड वर नावाने करु शकली नाही, त्यामुळे समाज बांधवांनी सुमोठो अँक्शन घेऊन तात्काळ समीती बरखास्त करावी*
*”दीक्षाभुमी” नागपूर भारतीय बौद्ध महासभा याच नावाने मालकी हक्काने एकुण २२एकर जमीन भोगवटदार म्हणून ७/१२ वर आणि आखीव पत्रिका मध्ये सरकारी रेकॉर्ड वर नावाने करन्यासाठी आज २४आरोपी विरुद्ध दिनांक ०६/०७/२०२४ रोजी मी खटला दाखल केला आहे*
*दिनांक २८/०६/२०२४ रोजीच मी नागपूर येथे १५००/-रुपये भरुन ,व १७० रुपये प्रति आखीव पत्रिका प्रमाणे व ७/१२, फेरफार पंजी ची नक्कल घेऊन पत्रकार परिषद, नागपूर टिळक भवनात, भारतीय बौद्ध महासभा या बॅनरखाली घेतली होती, व त्यात सांगितले होते की दीक्षाभुमी नागपूर , मालकी हक्काने नावाने नाही, सर्व सरकारी दस्तऐवज कायदेशीर फी भरून पुराव्यानिशी ७/१२ व आखीव पत्रिका, पत्रकार यांना दाखवली,व मालकी हक्काने नावाने करन्यासाठी समाजाने पुढे यावे असे आवाहन केले होते,व स्मारक समितीचे पदाधिकारी व महसूल अधिकारी यांचा वर अँक्शन घ्यावी ,असे सांगितले होते,जर समाजाने अँक्शन घेतली नाही तर मी एकटाच यांचा वर फौजदारी कारवाई न्यायालयातुन करनार आहे असे पत्रकारांनी प्रश्न विचारले होते ,तेव्हा त्यांना मी ठनकाऊन सांगितले होते,*
*भारतीय संविधान मेरे साथ है,डरनेकी क्या बात है,*
*तसाही मी एकटाच करोडोलो लय भारी आहे, फक्त डाॅ.बाबासाहेब यांचा मुळेच*
*आणि तसाही माझा इतिहास आहे, अगोदर पत्रकार परिषद घेऊन समाज बांधवांना सांगणे, त्यांनी लक्ष दिले नाही तर मग मात्र मी जनहीतासाठी ,न्याय व हक्कासाठी एकटाच कुनालाही आर्थिक मदत न मागता कोर्टात जाऊन न्याय मिळवित असतो*
*अन्याय करना-या पेक्षा अन्याय सहन करणे हा सर्वात जास्त मोठा गुन्हा आहे, असे डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात*
*स्मारक समितीचे पदाधिकारी दीक्षाभूमी नागपूर मालकी हक्काने नावाने करन्यासाठी ७० वर्षापासुन स्मारक समितीच्या पदाधिकारी यांचावर विश्वास होता, अखेर त्यांनी करोडो करोडो आंबेडकरी समाज बांधवांचा विश्वासघात केला आहे*
*म्हनुन “दीक्षाभुमी”नागपूर स्मारक समितीचे सर्व पदाधिकारी (भंतेजी सोडून,)व महसूलचे अधिकारी व भुमापन अधिकारी,दोन कंपनी, असे २४ आरोपी यांनी करोडो करोडो बौद्ध बांधवांचा विश्वासघात केल्यामुळे , बोगस सरकारी दस्तऐवज तयार करणे, मोठ्या प्रमाणात शासनाचा निधीचा गैर वापर करणे, “दीक्षाभूमी”नागपूर ला झुडपी जंगल ,सडक, रस्ते, इमारत पड,सन २०२० मध्ये दाखविले व आखीव पत्रिका मध्ये “शेती” सन २०१७ मध्ये दाखविले,व शासनाचा परिपत्रकाचा भंग करणे,फसवणूक करणे, म्हणून मी त्यांच्या विरुद्ध फौजदारी खटला पुराव्यानिशी आज दिनांक ०६/०७/२०२४ रोजी दाखल करनार आहे*💥💥💥💥💥
*एक लक्षात घ्या आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे मनमानीचे नाही*
*काही बिन डोक पत्रकार लोक ,व इतर पदाधिकारी याला ७/१२ व आखीव पत्रिका यातील फरक कळत नाही असेही लोक न्युज पोर्टल च्या माध्यमातून स्मारक समितीचे पदाधिकारी कडून, सुपारी घेऊन,रोज रोज दीक्षाभूमी सौंदर्य करन्यासाठी समाज विरोध का करत आहे अशा बोगस बातम्या अनेक दिवसांपासून देत आहेत, त्यांच्यापासून समाज बांधवांनी सावधान राहावे*
*त्यांचे नाव लिहिन्याची आवश्यकता नाही, समाज त्यांना सोडणार नाही*
*पत्रकार बांधवांने वस्तुनिष्ठ बातम्या प्रसिद्ध कराव्यात, संभ्रम निर्माण करू नये,व पुराव्यानिशी बातम्या प्रसिद्ध करावे,तुम्ही देशाच्या चौथ्या स्तंभ आहे*
*माननीय तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब यांनी, दिनांक १५/०८/१९६१लाच सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांना दीक्षाभूमी नागपूर, भारतीय बौद्ध महासभा,या नावाने ताबा दिल्यामुळे,आता माननीय भिमराव आंबेडकर साहेब व भारतीय बौद्ध महासभा पदाधिकारी यांनी दीक्षाभूमी नागपूर चां ताबा आपल्या हातात घ्यावे.*
*मी बोलत नसतो, तर करुन दाखवित असतो , नंतरच अधिकार वाणीने समाजाला सांगत असतो*
*मेरा काम ही मेरी पहचान है.*
*लवकरच खटल्याची अपडेट देनार आहे*
*जनहितार्थ जारी*
*देशहितासाठी*
*समाजहितासाठी*
*राष्ट्रबांधनीसाठी*
*समाज बांधवांनी जागृत राहावे*
*फिर्यादी -संघर्षी आयु.विनोदकुमार खोब्रागडे जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा संविधानाचे अभ्यासक तथा सामाजिक कार्यकर्ते तथा लोकसेवक तलाठी/पटवारी वरोरा चंद्रपूर*
*९८५०३८२४२६*
*८३२९४२३२६१*
वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज नागपूर
रिपोर्टर देवाशिष टोकेकर