
संजय पारधी बल्लारपूर
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर येथे भारतीय न्याय संहिता जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बल्लारपूर पोलीस आणि महाविद्यालयीन एनसीसी विभागाच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर बी डी चव्हाण सर होते तर म्हणून मुख्य वक्ते म्हणून पी.एस आय विकी लोखंडे होते.
कार्यक्रमाचे मुक्त मुख्य वक्ते पीएसआय लोखंडे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भारत सरकार द्वारे 2024 मध्ये जे नवीन कायदे अस्तित्वात आले ज्यात भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम या तीन महत्त्वपूर्ण नव्या कायद्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. हे नवीन कायदे ब्रिटिश कालीन कायद्यांच्या जागी अस्तित्वात आले आहे. त्याच प्रमाणे नवीन कायदे आधुनिक भारताची गरज असल्याचे सांगितले. कायक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. बीडी चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना कायद्याचे ज्ञान असणे कसे गरजेचे आहे याविषयी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमांमध्ये एनसीसी कॅडेट्स आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. दिवाकर मोहितकर सर यांनी केले तर आभार एनसीसी अधिकारी लेफ्टनंट प्रा. योगेश टेकाडे सर यांनी मानले या कार्यक्रमात डॉ. कावरे डॉ मंडल डॉ कायरकर डॉ फुलकर डॉ जुनघरे प्रा नंदुरकर प्रा गेडाम सर प्रा साखरकर प्रा माकोडे आणि इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.