Lok Sabha Chunav 2024Uncategorizedअन्य खबरेताज़ा ख़बरें
Trending

महिला वर्ग संध्याकाळ मंडळा तर्फे जागतिक योग दिवस हनुमान मंदीरात साजरा.

महिला वर्ग संध्याकाळ मंडळा तर्फे जागतिक योग दिवस हनुमान मंदीरात साजरा.

महिला वर्ग संध्याकाळ मंडळा तर्फे जागतिक योग दिवस हनुमान मंदीरात साजरा.
नागपूर : दक्षिण नागपूर येथील श्री जनार्दन स्वामी योगाभासी मंडळ संध्याकाळ महिला वर्ग योगा तर्फे सरस्वती नगर च्या हनुमान मंदिर परिसरात महिला मंडळांनी योग दिवस साजरा करून योग दिनाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाच्या महिला वर्ग संध्याकाळ मंडळाच्या अध्यक्षा अर्चनाताई क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यावेळी प्रमुख अतिथी पाहुणे म्हणून संजयराव खोंडे व वैशाली सुधाकरराव कोहळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक योग दिवस 21 जून हा 23 तारखेला संध्याकाळी योगा डान्स आणि झुंबा डान्स साजरा करण्यात आला. अर्चनाताई क्षीरसागर यांनी योग दिनाच्या दिनचर्या बाबतीत आपले महत्त्व मत व्यक्त करित कार्यक्रमाप्रसंगी सर्वांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रसंगी अतिथि प्रमुख पाहुणे संजयराव खोंडे तसेच वैशाली कोहळे व वंदनाताई बिंगेवार यांची उपस्थिती होती. २१ जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस मानला जातो. योग दिनाच्या कार्यक्रमा निमित्ताने महिलावर्ग संध्याकाळ योगातर्फे जागतिक दिवस सरस्वती नगरच्या हनुमान मंदिरात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमा प्रसंगी मंचावरील हास्य योगा वलबचे राजपाल सिंग बैस आणि सुनील बिंगेवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षा अर्चनाताई क्षीरसागर यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना योग प्राणायमामुळे सकारात्मक विचार येते. त्यामुळे आपले शरीर निरोगी, मन शांत आणि सुदृष्ट राहते. “रोज करा योग, नेहमी रहा निरोगी” असे मार्गदर्शन केलेत. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच महिलावर्ग संध्याकाळच्या महिलांनी योग्य नृत्य, योगा डान्स आणि झुम्बा डान्स करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीरित्या देवराव प्रधान, कल्पना निमकर, रूपाली तायवडे, सोनू मेश्राम, शामल चरोडे, मीनाक्षी भक्ते, सुनंदा निमकर, सविता चापले, कल्पना चापले, विमल फन्टके, नंदा बेले, राणी शहा, प्रवीण चुटकुले, निशा मस्के, जयश्री बैस, मीनाक्षी निखाडे, अनिता लांजेवार यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन रजनीताई मस्के तर संगीताताई थुटे यांनी प्रास्तविक व आभार मानले.

Show More
Back to top button
error: Content is protected !!