येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पराभवाच्या भीतीने आमदार किशोर आप्पा पाटील यांनी लोकप्रिय अपक्ष उमेदवार अमोल पंडितराव शिंदे यांचे मत विभाजन करण्यासाठी अनैतिक खेळी खेळली आहे.अमोल शांताराम शिदे नावाच्या व्यक्तीचा उमेदवारी अर्ज दाखल केला.नेहमी प्रमाणे धादांत खोटे बोलणारया आमदारांने आपल्यावरील आरोग्य फेटाळून लावला.मात्र नाव साधर्म्य असलेल्या उमेदवार अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत आमदार पुत्रासह नातेवाईक, व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित असल्याचे पुरावे अमोल शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पाचोरा भडगाव विधानसभेचे लोकप्रिय अपक्ष उमेदवार अमोल पंडितराव शिंदे यांनी आज दिनांक 3 रोजी त्यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे म्हटले की आमदार किशोर आप्पा पाटील यांचा पराभव आटळ आहे. पराभूत मानसिकता त्याना छळत आहेत