ताज़ा ख़बरें

महिलेला ब्लॅकमेल करून शारीरिक संबंधासाठी जबरदस्तीचा प्रयत्न

चाळीसगाव तालुक्यात गंभीर प्रकार

महिलेला ब्लॅकमेल करून शारीरिक संबंधासाठी जबरदस्तीचा प्रयत्न

चाळीसगाव तालुक्यात गंभीर प्रकार

चाळीसगाव (प्रतिनिधी) – चाळीसगाव तालुक्यातील एका महिलेला ब्लॅकमेल करून शारीरिक संबंधासाठी जबरदस्ती करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पीडित महिला बाथरूममध्ये अंघोळ करत असताना आरोपीने तिचे मोबाईलद्वारे व्हिडिओ आणि फोटो काढले. या अश्लील क्लिपचा वापर करून पीडितेला त्रास देत ब्लॅकमेल करत शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केल्या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दि. 18 जून 2025 रोजी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा प्रकार दि. 14 जून 2025 रोजी घडला व यापूर्वीही घडल्याची माहिती या तक्रारीतून समोर आली आहे.

फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी विनोद मोरसिंग पवार (वय २५) या आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 75(2), 77, 351(2) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 अंतर्गत कलम 67 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.सध्या आरोपी फरार झाला आहे.पुढील तपास चाळीसगाव ग्रामीण पोलिस करत असून फरार आरोपीचा शोध घेत आहेत.

Show More
Back to top button
error: Content is protected !!