
मुरूम येथे तथागत गौतम बुद्ध जयंती साजरी
प्रशांत गायकवाड -मुरूम
महात्मा गौतम बुद्ध पौर्णिमा या दिवशी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळाच्या वतीने डॉ आंबेडकर शहर वाचनालय मुरूम समोर जयंती साजरी करण्यात आली.
बुद्ध जयंती निमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन आणि ध्वजरोहन डी एल गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी कुबेर फायनान्सच्या वतीने अन्नदान आणि डी एल गायकवाड यांच्या वतीने खीर दान करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष प्रा महेश कांबळे उपाध्यक्ष आशिष नाईकवाडे सचिव प्रशांत गायकवाड कोष्याध्यक्ष संतोष कांबळे सह सचिव गौतम गायकवाड डॉ आंबेडकर शहर वाचनालायचे अध्यक्ष रुपचंद गायकवाड सचिव प्रा अण्णाराव कांबळे,साधू गायकवाड,प्रा राजेंद्र भालेराव,महेंद्र कांबळे, प्रा संतोष भालेराव, संदेश कांबळे, उदय कांबळे, राहुल गायकवाड, विशाल कांबळे,ज्ञानसागर भालेराव आदी उपस्थित होते.