- डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेची भव्य मिरवणूक

प्रशांत गायकवाड धाराशिव मुरूम
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त मुरूम शहरामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याचे पूजन API नितीन गायकवाड, प्रशांत गायकवाड, प्रा महेश कांबळे, आशिष मुरूमकर, गौतम गायकवाड यांच्या हस्ते सपन्न झाले. या मिरवणूकीत सोलापूर येथील डॉ आंबेडकरव गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे देखावे प्रस्तुत करण्यात आले होते.राहुल लेझीम पथक, तरुण कला पथक या दोन संघाने आपली कला सादर करीत मिरवणूकिला सुरुवात केली. डॉ आंबेडकर शहर वाचनालय येथून ही मिरवणूक सुरुवात झाली ही मिरवणूक पार पडण्यामध्ये प्रा अण्णाराव कांबळे, राहुल गायकवाड, मदनलाल गायकवाड, सिद्धेश्वर भालेराव, संतोष कांबळे,प्रणित गायकवाड, पवन कांबळे, विशाल कांबळे,भावेश गायकवाड,धर्मवीर बनसोडे,आदित्य बनसोडे आदीने पुढाकार घेतला. या मिरवणुकीची सांगता रात्री दहा वाजता करण्यात आली.












