
*कोपरगाव सिंधी समाज महिला मंडळ अध्यक्षपदी “सौ.कशिश शर्मा”* यांची निवड…
कोपरगांव-सिंधी समाजाचे इष्टदेवता भगवान झुलेलाल अर्थातच वरुणदेव यांची जयंती कोपरगाव शहरात नुकतीच मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.सदर प्रसंगी कोपरगाव शहर सिंधी समाज महिला मंडळाची नुतन कार्यकारणी पुढील दोन वर्षांसाठी जाहिर करण्यात आली.
यात अध्यक्षपदी सर्वानुमते सौ. कशिश विकी शर्मा यांची निवड करण्यात आली.
तसेच
उपाध्यक्षपदी-सौ वर्षा दिपक आर्य
सचिव-सौ.गुंजन राम आर्य
सहसचिव-सौ.कीर्ति शाम कॄष्णाणी
खजिनदार- सौ.दिव्या गोपी शर्मा व
सह खजिनदार-सौ.आंचल सुंदर आर्य
यांची निवड करण्यात आली.
यावेळी मावळते अध्यक्षा सौ.सिमरन खुबाणी यानी त्यांच्या कारकिरदित केलेल्या कार्याचा आढावा दिला.तर महिला मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा सौ.शालिनी खुबाणी यानी नुतन कार्यकारणी चा पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
नुतन अध्यक्ष कशिश शर्मा यानी येणाऱ्या काळात अनेक समाजोपयोगी कार्यक्रम घेण्यात येतील असा मानस व्यक्त केला.