
ठाणे :- अनधिकृत बांधकामांचे माहेर घर असणाऱ्या ठाण्यातील मनपा हद्दीतील शीळफाटा विभागात आता मोठ्या प्रमाणात वन जागेवरही अनधिकृत बिल्डिंग, गोडावून व बैठी चाली बांधकामे जोरात सुरू असून वनविभागाचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.
शीळ महापे रोड, शीळफाटा चौक ,मुनीर कंपाऊंड, पेट्रोल पंप समोर,शिळफाटा सर्कल सर्वे नंबर ८२,
मुनिर कंपाऊंड सर्वे नंबर ७२
भोला तबेला सर्वे नंबर १००, १०१
सहारा गेट सर्वे नंबर १,२,३ ठाकुरपाडा ,सिबलीनगर,भोळानाथ नगर , ग्रीन पार्क डोंगर परिसर येथे
दक्ष नागरिक संघटना शीळफाटा, यांनी पत्रकार परिषदेत वन अधिकारी RFO दिनेश देसले यांच्यामुळेच अनधिकृत बांधकामे वाढली असल्याचा थेट गंभीर आरोप केला आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ म्हणजे अँड.देवेंद्र फडणवीस व जेष्ठ नेते,वनमंत्री गणेश नाईक यांनी तातडीने दखल घेऊन संबंधित वन अधिकारी, भु माफिया यांच्यावर कठोर कारवाई करावी व सर्व वनक्षेत्रातील अनधिकृत बांधकामे भुईसपाट करून राष्ट्रीय संपत्ती वाचवावी अशीही मागणी केली संघटनेने केली आहे. वनविभाग अधिकारी, ठाणे महापालिका अतिक्रमण अधिकारी, भु माफिया व पोलीस प्रशासन यांचा सामुहिक सहभाग असल्याची चर्चा सुरू झाली आहे.