
सोलापूर -(प्रशांत गायकवाड)
शंकरराव शरणाप्पा आष्टे प्रशाला भुरीकवठे येथे स्वयंशासन दिन आणि निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
इयत्ता दहावीतील विध्यार्थी हे एक दिवसासाठी इतर वर्गाला अध्यापन करण्याचे कार्य पार पाडून स्वयंशासन दिन साजरा केला.
इयत्ता दहावीतील विध्यार्थ्यानी प्रशालेस भेट स्वरूप बारा खुर्ची देऊन त्यांनी आपली कृतज्ञता प्रशालेप्रति व्यक्त केली.
- निरोप समारंभ कार्यक्रमात दहावीतील विध्यार्थी भावुक होऊन आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर श्री. ढंगापुरे सर आणि मुख्याध्यापक कुलकर्णी सर यांनी परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन करून विध्यार्थ्यांच मनोबल वाढवून त्यांना शुभेच्छा दिल्या.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक कुलकर्णी सर, श्री ढंगापुरे सर,श्री सोलनकर सर, सौ लाटे मॅडम, श्री सुतार सर, श्री गायकवाड सर,श्री गवसने सर,श्री धुळशेट्टी सर, शिक्षकेत्तर कर्मचारी श्री कांबळे श्री व्हडलूरे श्री कुंभार श्री आष्टे श्री वडरे यांचे मार्गदर्शन लाभले.