
*राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार प्रदीप कांबळे यांना प्रधान*
*नाशिक* दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या 6 जानेवारी रोजी नाशिक येथे झालेल्या राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार समारंभात धाराशिव (उस्मानाबाद) येथील प्रदीप काशिनाथ कांबळे यांच्या पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यामुळे त्यांना राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार मराठा विद्याप्रसारक समाजाचे सरचिटणीस अँड नितीन ठाकरे व गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला या कार्यक्रमाला राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून राज्य कंट्रक्शन चे संचालक राजेश उपासनी मिसेस मलेशिया डॉ.ज्योती केदारे-शिंदे उत्तर महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी निशिगंधा कापडणीस रोटरी क्लब नाशिकचे अध्यक्ष ओमप्रकाशजी रावत भाजब प्रवक्ते व लोकप्रिय अँकर अजित चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यास महाराष्ट्र गुजरात राजस्थान मध्य प्रदेश आदी राज्यातून पुरस्कारार्थी आले होते हा पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रदीप कांबळे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे