त्रिलोक न्युज चॅनल जळगाव सोमेश मुळे: महापालिकेने मालमत्ता कर थकवणायाविरूधद कडक कारवाईचा धडक मोहीम सुरू केले आहे. प्रभाग क्रमांक तीन मध्ये 17 जणांचे नळ कनेक्शन ताबडतोब बंद करण्यात आले ज्यामुळे एकाच दिवसात आठ लाख रुपयाचे वसुली केली गेली आहे.
विधानसभा निवडणूक संपल्यानंतर महापालिका प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले असून आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाला वसुलीला प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार उपायुक्त धनश्री शिंदे आणि प्रभाग समिती क्रमांक तीन चे प्रभाग अधिकारी सुनील जाधव यांनी एक विशेष मोहीम सुरू केली आहे.या
मोहिमेत 17 थकबाकीदारचे नळ कनेक्शन बंद करण्यात आले असून आता या थकबाकी दारावर जप्तीची कारवाई सुरू होईल. महापालिकेने प्रभाग समिती दोन आणि चार यामध्ये मालमत्ता कराच्या वसुलीचे प्रक्रिया सुरू केले आहे काही बाकीदारांनी तीन दिवसाचे मुदत मागितल्याने त्यांना या मागणीला मान्यता देण्यात आले आहे तथापि २ डिसेंबर नंतर भरणा न केल्यास त्यांचे नळ कनेक्शन पुन्हा बंद करण्यात येईल. असा इशारा सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांनी दिला आहे.