त्रिलोक न्युज चॅनल संवाददाता जळगाव सोमेश मुळे: राज्य उत्पादन शुल्क भुसावळ विभागाचे उपनिरीक्षक राजकिरण सोनवणे यांच्यावर लाच घेतल्या प्रकारणी गंभीर आरोप करण्यात आले होते. २३ नोव्हेंबर रोजी भुसावळ येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईत दारुच्या बाटल्या पकडल्या होत्या . कारवाई न करण्याच्या बदल्यात राजकिरण सोनवणे यांनी ३० हजार रुपयांची लाज मागितली होती.या प्रकरणी सोनवणे व एक खासगी व्यक्ती किरण माधव सुर्यवंशी यांच्यावर फैजपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर सोनवणे फरार झाले होते.तयानंतर लाचलुचिपत विभागाने विशेष न्यायालयाच्या परवानगीने २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ७:३० वाजता सोनवणे यांच्या घरावर छापेमारी केली. या छापेमारीत ४० लाख ९८ हजार ४४ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. घरातून १ लाख ४९ हजार २९० रूपयांच्या दारूच्या बाटल्या २५ लिटर गावठी हातभट्टी दारू, बुलेट, मोटरसायकल, कारचे कागदपत्रे सोनं चांदी चे दागिने पिस्तूलाचया रिकाम्या पुगळया, तसेच १ लाख ९१ हजार रुपयांची रोकड आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या. या कारवाईमध्ये नाशिक लाचलुचिपत विभागाचे पोलिस अधीक्षक शर्मिला घागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने भाग घेतला.