
* *छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकासाठी पालिका आयुक्तांना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे निवेदन*
* नागपूर येथे छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकासाठी २२वर्षा अगोदर , तत्कालीन महापौर मा. विकास ठाकरे यांचे कार्यकाळात ठराव पारित करण्यात आला होता. परंतु मधल्या काळात भाजप शासण महानगरपालिकेत असतांना या ठरावावर चर्चा सुध्दा झाली नाही. ३०/४० लाख लोकसंख्येच्या शहरात राजर्षी शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यता परिषदेचे आयोजन केले होते. तत्कालीन परिस्थितीत त्यांनी चोखामेळा वस्तिगृहास ५०००रु चे दान सुध्दा दिल्या गेले. हा सामाजिक इतिहास या शहराला असतांना . शाहु महाराजांच्या स्मारकासाठी हि फार मोठी दप्तर दिरंगाई झाली आहे. आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाने ही बाब हेरून महाराजांच्या १५०व्या जयंतीनिमित्त नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित चौधरी यांची भेट घेऊन त्यांना एकंदर व्यथा सांगितली, या संबंधीची माहिती ओबीसी महासंघाचे शरद वानखेडे यांनी सांगितली , या प्रसंगी आयुक्तांनी एक महिन्यात या संदर्भात माहिती काढून ओबीसी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनां चर्चेला बोलाविण्याचे आश्वासन दिले . शाहु महाराजांचे स्मारक कुठेही नसल्याने, मनपा मध्ये शाहु महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन केले. आणि त्यानंतर आयुक्तांकडे शिष्टमंडळ देऊन निवेदन दिले. राष्ट्रीय सचिव शरदरावजी वानखडे, शहराध्यक्ष परमेश्वर राऊत, युवा अध्यक्ष सुभाषजी घाटे, गुणेश्वर आरीकर शकीलजी पटेल विनोद इंगोले, बाबाभाऊ ढोबळे, घनश्यामजी मांगे, रामभाऊ कावडकर, अशोक काकडे, चंद्रकांत हिंगे, एडवोकेट सूर्यकांत जयस्वाल, सुभाष पेंढारकर, हेमंतजी गावंडे, गणेशजी गडेकर. इत्यादी सहभागी झाले होते.