ठाणे : कल्याण लोकसभेतील कल्याण ग्रामीण भागात उबाठा गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला पुन्हा एकदा झटका बसला आहे. कारण कल्याण ग्रामीणमधील उबाठाचे उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, राष्ट्रवादी पवार गटाच्या विधानसभा संघटक निला पाटील यांच्यासह आगरी समाजातील ज्येष्ठ समाजसेवक, आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे, २७ गाव संघर्ष समितीचे दत्ता वझे या सर्वांनी शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाणे निवासस्थानी हा प्रवेश पार पडला. गेल्या आठवडाभरात कल्याण लोकसभेत उबाठा गटाला हा तिसरा मोठा झटका आहे. यापूर्वी डोंबिवली शहरप्रमुख विवेक खामकर, महिला जिल्हा संघटक कविता गावंड, उपजिल्हाप्रमुख प्रकाश म्हात्रे, माजी नगरसेविका प्रेमा प्रकाश म्हात्रे यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला होता.कल्याण ग्रामीण भागातले उबाठा गटाचे उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील हे गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत. मागील १० वर्षात कल्याण लोकसभेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या विकासकामांनी प्रभावित होऊन त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासह विभाग संघटक मधुकर शेळके, सुषमा ढोले, कैलास पाटील, उपविभाग प्रमुख प्रदीप चुडनाईक, शाखाप्रमुख गिरीश काळण यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विधानसभा संघटक निला पाटील यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासोबत मधुरा खेडकर, सरिता वाघेरे आणि मोठ्या प्रमाणात महिला कार्यकर्त्या आज शिवसेनेत सामील झाल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी त्यांचे शिवसेनेत स्वागत केले.
कल्याण ग्रामीण भागातले उबाठा गटाचे उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील हे गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत. मागील १० वर्षात कल्याण लोकसभेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या विकासकामांनी प्रभावित होऊन त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासह विभाग संघटक मधुकर शेळके, सुषमा ढोले, कैलास पाटील, उपविभाग प्रमुख प्रदीप चुडनाईक, शाखाप्रमुख गिरीश काळण यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विधानसभा संघटक निला पाटील यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासोबत मधुरा खेडकर, सरिता वाघेरे आणि मोठ्या प्रमाणात महिला कार्यकर्त्या आज शिवसेनेत सामील झाल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी त्यांचे शिवसेनेत स्वागत केले.