प्रतिनिधी -अनिकेत मशिदकर : नाशिक (पंचवटी) : यंदाच्या वर्षी उन्हाळ्याच्या नागरिकांना प्रारंभापासूनच कडाक्याच्या उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. वाहतूक सुरळीत राहावी यासाठी प्रशासनाने अनेक मुख्य चौकांत सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली असली तरी दुपारी दोन ते चार या कालावधीत नागरिकांना उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत असल्याने दुपारच्या वेळी असलेल्या उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन प्रशासनाने किमान दोन तासांसाठी सिग्नल यंत्रणा बंद करावी, वाहनधारकांनी केली आहे.
पंचवटीत अशी मागणी अनेक ठिकाणी असलेल्या मुख्य रस्त्यावर प्रशासनाने वाहतूक सुरळीत राहण्यासाठी सिग्नल यंत्रणा उभी केली आहे. काही सिग्नल यंत्रणेवर वाहनधारकांना दीड ते दोन मिनिटे उभे राहावे लागते. सध्या उन्हाळा सुरू झाल्याने दैनंदिन दुपारी दोन ते चार कालावधीत रस्त्यावर शुकशुकाट पसरून वाहतुकीची वर्दळ कमी होत आहे. मात्र, सिग्नल यंत्रणा सुरू राहत असल्याने चौफुलीवर असलेल्या वाहनधारकांना दीड ते दोन मिनिटे सिग्नल सुटेपर्यंत भर उन्हातच थांबावे लागत आहे. कडक उन्हात उभे राहून वाहनधारकांना उन्हाच्या झळा सहन करावा लागत असल्याने त्रास होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.