
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक.
धाराशिव -प्रशांत गायकवाड.
मुरूम -छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची भव्य अशी मिरवणूक शिवप्रेमी प्रतिष्ठानच्या वतीने मुरूम शहरात काढण्यात आली. शिवप्रेमी प्रतिष्ठानच्या वतीने 19 तारखेपासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या मिरवणुकीत अक्कलकोट येथील गौतम लेझीम संघ यांना त्यांची कला सादर करण्यासाठी पाचरण करण्यात आले होते.
शिवप्रेमी प्रतिष्ठानचे मुख्य नगर सेवक अजित चौधरी आणि त्यांचे सहकारी ही मिरवणूक यशस्वीरित्या विविध कार्यक्रम आयोजित करीत पार पाडली.
मुरूम शहरातील विविध संघटनेच्या वतीने प्रत्येक चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन बसवेश्वर मंडळ, अण्णाभाऊ साठे मंडळ, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ आदींनी पार पाडून त्यांना अभिवादन केले.